कोरोनामुळे शिर्डीच्या साई मंदिरातील दर्शन व्यवस्था सध्या तरी ऑनलाइनच

कोरोनामुळे शिर्डीच्या साई मंदिरातील दर्शन व्यवस्था सध्या तरी ऑनलाइनच

blank

अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या जरी कमी होत असली तरी राहाता तालुक्यातील रुग्ण संख्या वाढत आहे. शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर राहाता तालुक्यात येत असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने याठिकाणी दर्शन व्यवस्थेत केलेले बदल तूर्तास कायम ठेवण्यात येत आहेत, दर्शन व्यवस्था ऑनलाइनच राहील, अशी माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी येथे दिली.

शिर्डी उपविभागातील कोरोना परिस्थितीचा शनिवारी आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, राहाता तहसीलदार कुंदन हिरे व गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे उपस्थित होते.

डॉ. भोसले म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिर्डीतील साईबाबा मंदिरात दर्शन ऑनलाईन करण्यात आले होते. प्रसादालय ही बंद ठेवण्यात आले होते. कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेऊन यात वेळोवेळी बदल करण्यात येणार होता. सावळीविहीर ते शिर्डीपर्यंत रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याच्या संबंधितांना सूचना देण्यात येतील, असे डॉ. भोसले यांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या