अचानक तापमानात बदल होऊन राज्यात विविध ठिकाणी पावसाची शक्‍यता

पुणे : गेले काही दिवसांपासून थंडीचा कडाका जाणवत असताना येत्या दोन दिवसात अचानक तापमानात बदल होऊन राज्यात विविध ठिकाणी पावसाची शक्‍यता निर्माण झाली आहे.मालदीव ते अरबी समुद्र आणि कर्नाटकचा परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.त्यामुळे येत्या बुधवार पर्यत (7 फेब्रुवारी) राज्यातील दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. हा कमी दाबाचा पट्टा कर्नाटक आणि गोव्याच्या दिशेने सरकत असल्याने राज्यात त्याचा परिणाम जाणविणार आहे.

bagdure

त्यामुळे थंडी ची लाट कमी होऊन ढगाळ वातावरण निर्माण होईल असाही अंदाज आहे.दरम्यान, आज राज्यातील विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट तर कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रातील तापमानात किंचित घट झाली आहे. पुणे शहरातही आज किमान तापमान 12.5 अंश सेल्सिअस नोंदिवले गेले आहे.हे तापमान सरासरीच्या तापमानाच्या एक ते दोन अंशाने जास्त आहे.शहरात आगामी काळात ही तापमानात वाढ होण्याची शक्‍यता आहे.त्याचबरोबर कमाल तापमानात वाढ होऊन ते 33 अंशापर्यत पोहचेल असे ही हवामान खात्याने कळविले आहे.

Comments
Loading...