पिंपरी शहालीमधे श्रीपाद छिंदम याचा चौकात पुतळा जाळून निषेध

नेवासा: अहमदनगर उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याचा ऑडीयो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. मराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरले याचा निषेध करण्यासाठी आज सकाळी नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाली या गावात चौकात शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणा देत श्रीपाद छिंदम याचा पुतळा जाळून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

तसेच यावेळी लोकक्रांती सेनेचे अध्यक्ष सचिन नवथर, रपंच नानाभाऊ नवथर,पि. श.शिवसेना अध्यक्ष बाळासाहेब विनायक नवथर,बी.जे.पी.चे युवा कार्यकर्ते दत्ताभाऊ नवथर,संदीप आरगडे,दत्तात्रय कदम,किशोर नवथर,विकास आवळे,माजी सरपंच भिमराज नवथर,अशोक रामनाथ नवथर,राहुल नवथर,सोमनाथ संभाजी नवथर,संदीप दत्तात्रय नवथर,देविदास कुऱ्हाडे, मिथुन कुऱ्हाडे, योगेश नवथर,गणेश एकनाथ पवार,प्रसाद बाळासाहेब नवथर,संतोष जालिंदर नवथर,प्रकाश पाथरकर आदी उपस्थित होते.

You might also like
Comments
Loading...