भारतातील सशक्त लोकाशाहीमुळे एक चहा विकणारा चौथ्यांदा आमसभेत भाषण देतोय – मोदी

narendra modi

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या काळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच विदेश दौऱ्यावर गेले आहेत. ते तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिका, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया या चार देशांचा समावेश असलेल्या क्वाड परिषद झाल्यानंतर मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची देखील काल भेट घेतली. दरम्यान, संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत मोदी यांनी आज भाषण केले.

यावेळी त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षासह कोरोना महामारी, आंतरराष्ट्रीय प्रश्न, आतंकवाद, भारताचे महत्व अशा विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असणारा देश असून या लोकशाहीमुळेच एक चहा विकणारा चौथ्यांदा संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत भाषण देतोय,’ असं पंतप्रधान मोदी यांनी नमूद केलं.

‘भारतातील सशक्त लोकाशाहीमुळे एक चहा विकणारा चौथ्यांदा भाषण देत आहे. भारतातील विविधता ही भारताची ताकद आहे भारत विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे. भारताची विविधता त्याच्या लोकशाहीचा पुरावा आहे. देशवासियांची सेवा करताना मी 20 वर्षे पूर्ण केली आहेत. मी आधी मुख्यमंत्री आणि आता पंतप्रधान म्हणून लोकांची सेवा करत आहे,’ असं भाष्य मोदी यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या