पायलटचा जेवणाचा डब्बा न धुतल्याने, विमानाचं उड्डाण २ तास उशीरा

टीम महाराष्ट्र देशा : एयर इंडियाच्या बेंगळुरू-कोलकाता विमानात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पायलटचा जेवणाचा डब्बा न धुतल्याने कर्मचारी आणि पायलट मध्ये हाणामारी झाली आहे. या प्रकारामुळे विमानाच्या उड्डाणाला तब्बल २ तास वेळ लागला असून प्रवाशांचा चांगलाचं खोळंबा झाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पायलटने आधी या कर्मचाऱ्याला डब्यातील जेवण गरम करण्यास सांगितले. जेवण झाल्यानंतर त्याने हा डबा धुवून आण असे त्या कर्मचाऱ्याला सांगितले. त्या कर्मचाऱ्याने डबा धुण्यास नकार देताच पायलट चिडला आणि ओरडायला लागला. काही वेळातच दोघही हमरीतुमरीवर आले. विमानातील प्रवाशांसमोरच त्यांनी एकामेकाला हाणामारी करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून प्रवासी थक्क झाले. एयर इंडियाच्या व्यवस्थापनालाही याची माहिची मिळताच त्यांनी लगेच दोघांना विमानातून बाहेर काढले. नवीन पायलटची व्यवस्था व्हायला बराच वेळ लागला. यामुळे विमानाच्या टेक ऑफला दोन तास उशीर झाला. प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.

 Loading…
Loading...