उसाला तोड न मिळाल्यामुळे शेतकरी कुटुंब आत्महत्तेच्या उंबरठ्यावर

विरोधी पक्षाचे काम केल्यामुळे मुळा कारखाना प्रशासनाचा बदला

नेवासा/कांगोनी : विरोधात काम केलं म्हणून ऊसाची नोंद असतानाही मुळा कारखान्याने ऊसाला तोड दिलीच नाही. हि भानसहिवरे येथील जनार्धन जाधव यांची घटना ताजी असतांनाच तालुक्यात दुसरी घटना उघडकीस आली आहे. नेवासा तालुक्यातील कांगोनी येथील शेतकरी गोरख साळुंके यांनी विरोधी पक्षात काम केले म्हणून मुळा कारखान्याकडे नोंद असतानाही कारखाना प्रशासनाने त्यांच्या ऊसाला तोड दिलीच नाही.

farmer newasa

गोरख साळुंके यांची कौटुंबिक व आर्थिक परिस्थिती हि अतिशय हालकीची असून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच उसावर होणार होता. ऊसाल तोड येईल व पाच पैसे मिळतील अशी आशा होती. सदर घटनेप्रकरणी शेतकरी  साळुंके यांनी कारखाना प्रशासनाला ऊसाला तोड मिळण्यासाठी संपर्क साधला असता शेतात गाड्या जाणारच नाही, थोडं थांबा, तर कधी थेट ऊसाला तोड मिळणारच नाही अशी उडवाउडवीची उत्तरे कारखाना प्रशासनाने दिली.

आपण विरोधात काम केले म्हणूनच आपल्या ऊसाला तोड मिळत नाही असे साळुंके यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट मंत्री, साखर आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. तक्रारीत नमूद आहे की, नोंद असूनही ऊसाला तोड मिळालेली नसून शेतात आता फक्त ४% ऊस उभा आहे. बाकीच्या ९६% उसाच्या खोडक्या झाल्या आहे. तरी कारखाना प्रशासनाकडून न्याय मिळेल हि अपेक्षा आहे. जर लवकर न्याय नाही मिळाला तर मी सह कुटुंबासह हत्या करणार असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

 

farmer report