‘महाराष्ट्र बंद’ मुळे विद्यापीठांनी परीक्षा पुढे ढकलल्या

विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय

पुणे : भीमा-कोरेगाव येथे झालेल्या दगडफेकीचा निषेध म्हणून भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यामुळे सावित्रीबाई फुले विद्यापीठानं आजचा एम.फार्म.चा एक पेपर पुढे ढकलला आहे. ही परीक्षा पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यात होणार होती.
तर दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं आज (बुधवार) होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. एमए, एमबीए अभ्यासक्रमाचे पेपर आज होणार होते. काही भागातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.