नियोजन नसल्यामुळे प्रवेश प्रक्रियेत प्रचंड गोंधळ

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने पदव्युत्तर प्रवेशासाठी ठेवलेल्या स्पॉट अ‍ॅडमिशनचे नियोजन फसल्यामुळे मोठा काळ तातकळत वाट पाहून सहनशक्‍तीचा अंत झालेल्या विद्यार्थ्यांनी विधी, गणित आणि रसायनशास्त्र या तीन विभागात मोडतोड केली. कुलगुरूंच्या दालनातही या विद्यार्थ्यांनी प्रवेश करून तेथे प्रचंड घोषणाबाजी केली.कसलीही नियमावली तयार न करता राज्यभरातून केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना बोलावल्याने गोंधळ झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. गोंधळ झाल्यास कोणत्याही विभागासाठी अतिरिक्‍त मदत देता येईल अशी कोणतीही व्यवस्था विद्यापीठ प्रशासनाने केली नव्हती. गोंधळ अवाक्याच्या बाहेर चालला तेव्हा अखेर विद्यापीठ परिसरात पोलिस बोलवावे लागले.

You might also like
Comments
Loading...