वैजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे धरणे काठोकाठ, नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

vaijapur

औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील बोरदहेगाव मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे प्रकल्पाचे अतिरिक्त पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून ६४ क्युसेकने विसर्ग सोडण्यात आले आहे. दरम्यान प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आल्यामुळे धरणक्षेत्रासह नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या चार पाच दिवसांत तालुक्यात अतिवृष्टीसह मुसळधार पाऊस झाल्याने मोठा हाहाकार उडाला. परिणामी तालुक्यातील नद्यांना पूर येऊन परिस्थिती गंभीर झाली होती.

तालुक्यातील अपवाद वगळता जलसाठेही पूर्ण क्षमतेने भरली आहेत. सध्या तालुक्यातील बोरदहेगाव मध्यम प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्यामुळे ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १३.४० दलघमी म्हणजेच १००% टक्के जलसाठा झाला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून अजूनही पाण्याची आवक सुरू आहे. धरणाच्या द्वार क्रमांक १ व ६ मधून प्रत्येकी ३२ क्युसेक म्हणजेच एकूण ६४ क्युसेकने विसर्ग नदीपत्रात सोडण्यात आला आहे.

धरण सुरक्षितता पाळण्यासाठी पाण्याची असल्यामुळे आवक वाढतच नदीपात्रालागत मानवी वस्ती, घरे, स्थावर व जंगम मालमत्ता, कृषी जमीन, जनावरे, पशु, पक्ष्यांचे नुकसान होऊ नये म्हणून नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधायचे दरवाजे, प्लेट्स काढण्यात आल्या आहेत. नदीच्या प्रवाहास अडथळा होऊ नये म्हणून प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे. धरणातील विसर्ग सोडण्यात आल्यामुळे नागपूर-मुंबई महामार्गावरील वाहतूक थांबविली जाऊ शकते असेही प्रशासनाने कळविले आहे.

महत्त्वाच्या बातम्या