पावसाचा मुंबईला दणका रस्ते लोकल वाहतूक ठप्प

टीम महाराष्ट्र देशा : मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून सुरु झालेला पाऊस काही थांबायचा नाव घेत नाही. पावसाने मुंबईसह अंधेरी, मालाड, बोरिवली, घाटकोपर भागात रात्रभर मुसळधार पाऊस सुरु असून विरार मध्ये पावसाचे पाणी साचले असल्यामुळे सर्व ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. या पावसामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल होतांंना दिसता आहेत यामुळे जवळपास १२ एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या असून विरार ते बोरिवलीत पावसाचा कहर सूर आहे. या भागात  गेल्या ३० वर्षात कधीही पाणी साचलं नव्हतंं.

गेल्या अनेक दिवसापासून सुरु असलेला पावसाचा जोर आजही कायम असल्याने मुंबईकरांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो आहे. मुंबई आणि ठाणे या परिसरात येत्या पाच दिवसात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पालघरमध्ये पाऊस जास्त असल्याने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  मुंबईत पावसाचा जोर लक्षात घेता मुख्याध्यापकांनी सुट्टी जाहीर करावी अशा सूचना शिक्षणसंचालकांनी दिल्या आहेत. सायन-माटुंगा दरम्यान लोकल सेवा अत्यंत धिम्यागतीने सुरु असून चर्चगेट ते वसई लोकल २० मिनिटे उशिरा धावत आहे. पूर्व द्रुतगती मार्गावर माटुंगा उड्डाणपूलावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
पश्चिम रेल्वेच्या प्रवासांसाठी हेल्पलाईन नंबर– मुंबई सेंट्रल- 23077292/02267645552, वांद्रे टर्मिनस-26425756/02267647594, बोरिवली-02267634746, सुरत- 02612401791

सरकारच्या विरोधात घोषणा देत, विरोधकांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

पर्जन्यवृष्टीमुळे नगर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत