स्वर्गीय वसंतराव भागवतांच्या कष्टामुळे आज भाजपला चांगले दिवस आले -आ. देशमुख

सोलापूर : स्वर्गीय वसंतराव भागवत यांचे भारतीय जनसंघ, जनता पक्ष आणि भाजपच्या संघटनात्मक उभारणीत मोलाचे योगदान होते. भाजपमधील अनेक ज्येष्ठ नेते त्यांना गुरुस्थानी मानत होते. त्यांच्या कष्टामुळे आज भारतीय जनता पक्षाला चांगले दिवस आले आहेत. त्यांचा आदर्श घेऊन आज सर्व कार्यकर्त्यांनी काम करावे, असे प्रतिपादन माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी केले.

भारतीय जनता पक्ष कार्यालय येथे शुक्रवारी सकाळी 10 वाजता भाजपा नेते स्व. वसंतराव भागवत यांच्या स्मृतिस अभिवादन करून ‘कार्यकर्ता सम्मान दिनानिमित्त’ जेष्ठ कार्यकर्त्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी आमदार देशमुख बोलत होते.

Loading...

याप्रसंगी शहराध्यक्ष विक्रम देशमुख, जिल्हा अध्यक्ष शहाजी पवार, सरचिटणीस बिज्जू प्रधाने, पांडुरंग दिड्डी, शशी थोरात, सभागृह नेता श्रीनिवास करली, रामचंद्र जन्नू, विश्वनाथ बेंद्रे रामचंद्र तडवळकर, रोहिणी तडवळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार देशमुख यांच्या हस्ते पांडुरंग दिंडी, बादशहा भाई शेख, रोहिणी तडवळकर, राम तडवळकर, बाबुराव घुगे, रामचंद्र जन्नु, बंडू कुलकर्णी, विजय जागीरदार, शोभा नष्टे आदी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अशोक गडहिरे, नगरसेविका मेनका राठोड, अविनाश बोमड्याल, राजश्री चव्हाण, इंदिरा कुडक्याल, मंडल अध्यक्ष महेश देवकर, सुधाकर नराल, सुनिल गौडगांव, अविनाश बेंजरपे, विठ्ठल बंडगंची, विजय जहागीरदार, अंबण्णा बिंगी, श्रीनिवास पूरूड, नागेश गंजी, श्रीधर गोखले, सुजित चौगुले, बंडू कुलकर्णी, आनंद बिरू, लक्ष्मण गायकवाड, महेश अलकुंटे, अक्षय अंजीखाने, ऋतुजा अंदेली, भिमाशंकर बिराजदार, विजय इप्पाकायल, चंद्रकांत पोतदार, कार्यालय प्रमुख सुनिल टोणपे आदी उपस्थित होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....