fbpx

नैराश्यापोटी सरकारवर बेछूट आरोप करतात; ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची विरोधकांवर टीका 

pankaja munde

टीम महाराष्ट्र देशा – देशात व राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळेच सर्व सामान्य जनतेला न्याय मिळू लागला आहे. जनतेच्या विकासाचं स्वप्न पुर्ण होत आहे. विरोधकांकडे मात्र आता कोणताही मुद्दा शिल्लक राहिला नसल्याने नैराश्यापोटी ते सरकारवर बेछूट आरोप करत असल्याची टीका ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर केली. त्या श्रीगोंदा नगरपरिषच्या सार्वत्रिक निवडणूकीतील भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनिता शिंदे व १९ नगरसेवकांच्या प्रचारार्थ शहरातील सभेत बोलत होत्या.

यावेळी मुंडे म्हणाल्या, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारने स्वच्छ व पारदर्शक कारभार करत शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी व सर्व सामान्य माणसाला विकासाच्या प्रवाहात आणले. सामान्य जनतेसाठी उज्ज्वला गॅस, स्वच्छता अभियान, शौचालये, घरकुल आदी योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत.

मागेल त्याला शेततळी, जलयुक्त शिवार, ग्रामीण रस्ते, बचतगटांना शुन्य टक्के दराने कर्ज, मुलभूत विकास निधी, एवढेच काय प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते स्मशानभूमी बांधण्यापर्यंतचा निधी आपण दिला असल्याचे सांगितले. यावेळी केंद्र व राज्य सरकारने केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचा लेखाजोखा मांडताना कॉंग्रेस व राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव पाचपुते होते.

1 Comment

Click here to post a comment