ढवळीकरांची उचलबांगडी; उपमुख्यमंत्रीपदावरून आठ दिवसातच हकालपट्टी

पणजी : गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यामागे गोव्यात भाजपची राजकीय वाताहत होईल असा अंदाज लावला जात असताना अचानक गोव्याच्या राजकारणाने एक नवे वळण घेतले आहे. गोव्याचे उपमुख्यमंत्री सुदीन ढवळीकर यांचे उपमुख्यमंत्रीपद केवळ आठवडाभराचेच ठरले आहे. त्यांच्या महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाच्या दोन्ही आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ढवळीकरांना उपमुख्यमंत्रीपदावरून हटवले आहे.

गोव्याचे उपमुख्यमंत्री सुदीन ढवळीकर यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीच्या दोन आमदारांनी मंगळवारी मध्यरात्री भाजपात प्रवेश करत महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीचं भाजपमध्ये विलिनिकरण केल्याने गोव्यातील राजकारणात ट्विस्ट आला आहे.

Loading...

आमदार मनोहर आजगावकर आणि दीपक पावस्कर यांनी गोवा विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो यांच्याकडे पत्र दिलं आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचं भाजपात विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.

महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे एकून तीन आमदार आहेत. यात आम्ही दोन तृतीयांश सदस्य असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. मात्र, पक्षाचे तिसरे आमदार सुदिन ढवळीकर यांनी या विलिनीकरणाच्या प्रस्तावावर सही केली नाही.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
राष्ट्रवादी-मनसेचे कार्यकर्ते भिडले