जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगराईचे थैमान

अहमदनगर: जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलक्या सरी बरसल्यायामुळे फळबागांना हा पाऊस नुकसानकारक ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या उरात धडकी भरली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रासह इतर भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार शुक्रवारी रात्री थंड वाऱ्यासह काही भागात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या.

नेवासा,राहुरी, नगर तालुक्यासह रिमझिम पाऊस झाला. यामुळे फळबागा तसेच रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, कांदा या पिकाची काढणी सुरु झाली असून शेतमाल झाकण्यासाठी शेतकऱ्याची चांगलीच धावपळ उडाली आहे. तसेच पिकांवर या ढगाळ वातावरणामुळे रोगराईचा प्रादुर्भाव दिसून येऊ लागला आहे.

You might also like
Comments
Loading...