पोलीस कोठडीत पडल्यामुळे डीएसके आयसीयूमध्ये दाखल

प्रकृती स्थिर असल्याची माहिती

पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना हायकोर्टाने अटकेपासून दिलेलं संरक्षण दूर केले होते.
त्यामुळे डीएसकेंना अटक करण्यात आली होती. डीएसके यांना शनिवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात होती. त्यामुळे पोलिस कोठडीत तोल जाऊन पडल्यामुळे डीएसकेंना मध्यरात्री ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

डीएसकेंची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्या नंतर डीएसकेंची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली होती. मात्र मध्यरात्री तीन वाजता डीएसके यांना अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते कोठडीत तोल जाऊन पडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याची चर्चा पसरत आहे.

अचानक झालेल्या या घटनेने पोलिसांची धावपळ उडाली असून त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. सिटी स्कॅन व एमआरआय करण्यात आले. त्यात ब्रेन हॅमरेज झाले नसल्याचे समोर आले. सध्या डीएसके यांच्यावर ससून रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत

You might also like
Comments
Loading...