ढोल ताशा महासंघातर्फे वाद्यपूजन रविवारी

पुणे : गणेशोत्सवात पुण्यासह महाराष्ट्रात महत्त्वाची भूमिका बजावणा-या ढोल ताशा पथकांच्या ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र तर्फे वाद्यपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवार, दिनांक २२ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते केसरी वाडयातील लोकमान्य सभागृहात वाद्यपूजन कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी दिली.

वाद्यपूजनामध्ये पुणे आणि परिसरातील विविध ढोल ताशा पथकांचे प्रमुख आणि वादक मोठया संख्येने सहभागी होणार आहेत. तसेच यावेळी सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

वर्षभर विविध सामाजिक कामांच्या माध्यमातून पथकातील तरुणाई वारंवार एकत्र येते. मात्र गणेशोत्सवापूर्वी सर्वच पथकातील वादकांनी एकत्र येऊन वाद्यपूजन करावे, याकरीता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वाद्यपूजनाच्या निमित्ताने सर्व ढोल-ताशा पथके आणि त्यामधील वादक एकत्र येणार आहेत. तरी, ढोल-ताशा पथकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहनही पराग ठाकूर यांनी केले.

 

धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याच्या तयारीत ?

अल्पसंख्यांक समाज शिष्यवृत्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ; आमदार ख्वाजा बेग यांच्या मागणीला यश