अर्धशतक करताच डु प्लेसिसने रचला खास विक्रम; हा विक्रम करणारा चेन्नईचा पहिलाच खेळाडू

दिल्ली : आयपीएलमध्ये शनिवारी झालेल्या चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या लढतीत मुंबईने ४ गडी राखुन सीएसकेचा पराभव केला. सीएसकेने दिलेल्या २१९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग यशस्वीपणे करत ४ गडी राखुन मात केली. वादळी अर्धशतकासाठी मुंबईच्या कायरान पोलार्डला सामनावीराच्या पुरस्कारनाने सन्मानीत करण्यात आले.

या सामन्यातील पहिल्य डावात ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात ऋुतूराज गायकवाड ४ धावावर माघारी तंबुत परतला. यानंतर मोईन असीसोबत सलामीवीर फाफ डु प्लेसिसने शतकी भागीदारी करत चेन्नईचा डाव सावरला. यावेळी डुप्लेसिसने शानदार अर्धशतक झळकावत संघाच्या धावसंख्येला हातभार लावला. या अर्धशतकासह डु प्लेसिस हा चेन्नईकडुन सलग चार सामन्यात अर्धशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

या आधी ऋतुराज गायकवाडने चेन्नईकडून सलग ३ सामन्यात अर्धशतक झळकावले होते. ऋतुराजने ही कामगिरी २०२० आयपीएल स्पर्धेत केली होती. तर २०२१ आयपीएल स्पर्धेत डु प्लेसिसने या सामन्याआधी अनुक्रमे ९५(६०), ५०(४१) आणि ५६(३८) आशी कामगिरी केली होती. मुंबई इंडियन्स विरुद्ध डु प्लेसिसने २८ चेंडूत ५० धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान डु प्लेसिसने २ चौकार आणि ४ षटकार ठोकले.

महत्वाच्या बातम्या

IMP