fbpx

डीएसके प्रकरणात पोलिसांनी केली बँक ऑफ महाराष्ट्रच्या आजी- माजी अध्यक्षांना अटक

ds-kulkarni

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर डी एस कुलकर्णी आर्थिक घोटाळा प्रकरणात आता बँकिंग क्षेत्रातील बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई पुणे पोलिसांनी सुरुवात केली आहे. डीएसके यांना बेकायदेशीर मदत केल्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राच्या आजी माजी अध्यक्षांसह 6 अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर सर्वांची कसून चौकशी करण्यात येत असून काही धक्कादायक खुलासे पुढे येणाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे, कार्यकारी संचालक सुरेंद्र के, माजी अध्यक्ष सुशील मुनोत, झोन मॅनेजर नित्यानंद देशपांडे, डीएसकेचे सीए सुनील घाटपांडे यांना आज दुपारी अटक करण्यात आली. या सर्वांनी डीएसकेच्या बोगस कंपन्यांना कर्ज देऊन आर्थिक घोटाळा करण्यात त्यांना मदत केल्याच पोलीस तपासात समोर आले आहे.