fbpx

डीएसके अजित पवारांच्या भेटीला

dsk with ajit pawar

मुंबई : आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेले डीएसकेंनी आज मुंबईत अजित पवारांची भेट घेतली. डीएसके आणि अजित पवारांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी हि भेट झाली आहे.

गुंतवणूकदारांचे पैसे देण्यासाठी वेळ पडल्यास डीएसकेंनी भिक मागावी पण कोर्टात पैसे भरावेत असे मुंबई हायकोर्टाने डीएसकेला सुनावलं होत. या पार्श्वभूमीवर डीएसकेंनी मुंबईत अजित पवारांची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधान आलं आहे.

डीएसकेंनी अजित पवारांकडे या व्यावसायिक आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी मदतीचे आवाहन केल्याचं समजते. डीएसके क्राऊड फंडिंगचा पर्याय पुढे करून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडे आर्थिक मदतीचे आवाहन करत आहेत. गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी डीएसके त्यांच्या मालमत्ता विकायला तयार आहेत. पण व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यांकडून डीएसकेंची चोहोबाजूनी कोंडी करून त्यांच्या मालमत्ता या स्वस्तात घेण्यासाठी डाव आखला जात आहे. डीएसकेंनी अजित पवारांकडे या आर्थिक कोडींतून बाहेर पडण्यासाठी सर्वोतपरी मदत करण्याचं आवाहन केल्याच आणि अजित पवारांनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याची चर्चा आहे