डीएसकेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, ठेवीदारांचे पैसे भरण्यासाठी १९ जानेवारीपर्यंत मुदत

सुप्रीम कोर्टाने दिला डी. एस. कुलकर्णी यांना तात्पुरता दिलासा

पुणे: अटकेची टांगती तलवार दूर करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा अखेर डीएसके कुलकर्णी यांनी थोठाला आहे. आणि विशेष म्हणजे ठेवीदारांचे ५० कोटी रुपये १९ जानेवारीपर्यंत जमा करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे डीएसके यांना सध्या तरी तात्पुरता दिलास मिळाला आहे. त्यामुळे १९ जानेवारीपर्यंत तरी पोलीस डीएसकेना अटक करू शकत नाहीत. मुंबई हायकोर्टाने मुदतवाढ देण्यास नकार दिल्यानंतर डीएसके फरार होते मात्र त्यानंतर देखील त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली व अखेर त्यांना पैसे भरण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे.

काय म्हणाले डीएसके

५० कोटी रुपये पैसे भरण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला 19 जानेवारी 2018 पर्यंत मुदत वाढवून दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीत ही सर्व रक्कम जमा करण्यात येईल. कोणाचाही एक रुपयादेखील आम्ही ठेवणार नाही व कोणाचीही फसवणूक होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने आमचे म्हणणे ग्राह्य धरून मुदत वाढवून देऊन आमच्यावर विश्वास दाखविला आहे. आता सर्व गोष्टी व्यवस्थित होतील व व्यवसाय नक्कीच पूर्वपदावर येईल.