डीएसके ५० कोटी भरण्यात अपयशी; कोर्टाने फटकारले

नागरिकांचे पैसे बुडवून डीएसके सुखाने झोपतात

मुंबई: ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींना मुंबई हायकोर्टाने पुन्हा एकदा फटकारले आहे. आज मुंबई हायकोर्टात सुनावणी दरम्यान नागरिकांचे पैसे बुडवून डीएसके सुखाने झोपतात, अशे डीएसकेला कोर्टाने फटकारले. डीएसकेंच्या अटकेबाबत आता २२ जानेवारी रोजी निर्णय होणार आहे.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी पुन्हा एकदा ५० कोटी भरण्यात अपयशी ठरले आहेत. डीएसकेंच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी होती. सुनावणीवेळी डी एस कुलकर्णी यांनी लिलावासाठी १२ कोटींच्या संपत्तीची कागदपत्रं सादर केली. १२ कोटींची संपत्ती तातडीने ताब्यात घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. २२ फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालय निकाल देणार आहे. डीएसकेंना हायकोर्टात ५० कोटी रुपये जमा करायचे होते. मात्र डीएसकेंनी यातील १२ कोटी रुपये जमा केले. बुलढाणा अर्बन बँक डीएसकेंच्या मदतीला या संकटसमयी धावून आली आहे. बुलढाणा बँकेने १२ कोटी रुपये दिल्याची माहिती कुलकर्णींच्या वतीने हायकोर्टात देण्यात आली. तसेच याच बँकेकडून १०० कोटी रुपये घेणार असून या मोबदल्यात बँकेकडे मालमत्तेचे कागदपत्रं दिली जातील, असे त्यांनी हायकोर्टात सांगितले.

Shivjal