‘घराला घरपण’ देणाऱ्या डी एस कुलकर्णींच्या घराचा होणार लिलाव

टीम महाराष्ट्र देशा: गुंतवणूकदारांचे २३० कोटी रुपये थकवल्याप्रकरणी अटकेत असणारे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी एस कुलकर्णी यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. कारण सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाकडून घटलेले कर्ज थकवल्याने त्यांच्या घराचा लिलाव करण्यात येणार आहे.

पुण्यातील सेनापती बापट रोडवरील चतुःश्रृंगी टेकडी लगत डी.एस. कुलकर्णी यांचा आलिशान बंगला आहे. 8 मार्चला सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून याचा लिलाव होणार आहे. बंगल्याची बेस प्राईस 66 कोटी 39 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.