डीएसकेंच्या अडचणीत वाढ ; डीएसकें विरोध जावयाचा १०० कोटींचा दावा

डीएसकें

पुणे: डीएसकेंनी पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या भावाचा जावई केदार वांजपेंवर आपल्याबद्दल खोटी माहिती पसरवत असल्याचा तसेच माहीती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांना आपल्या आणि आपल्या व्यवसायाबद्दलची माहिती पुरवत असल्याचा गंभीर आरोप केला होता. यालाच धरून आता त्यांचे जावई केदार वांजपे यांनी डीएसकेंवर 100 बदनामीचा कोटींचा दावा ठोकला आहे.

केदार वांजपे हे आधी डीएसकेंबरोबर काम करत होते. ड्रीम सिटीसाठी जागा खरेदी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. पण पुढे डीएसके आणि वांजपेंमधे आर्थिक कारणांवरुन वाद झाला आणि वांजपे 2009 मध्ये डीएसकेंपासून वेगळे झाले होते.

यामुळे आधीच कायदेशीर अडचणींना तोंड देत असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसियाक डीएस कुलकर्णींच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

1 Comment

Click here to post a comment
Loading...