पुणे : एसएफआयच्या मद्यधुंद अध्यक्षाचा विद्यापीठात धुडगूस

satish debade

पुणे: सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठ हे भारतातील पहिल्या १० विद्यापीठांमध्ये आहे . परंतु गुणवत्तेपेक्षा इतर कारणांमुळेच विद्यापीठ सध्या चर्चेत आहे. काल रात्री ११ वाजता स्टूडेंट फ़ेडरेशन ऑफ इंडिया चा विद्यापीठ अध्यक्ष सतीष देबडे याने दारू पिउन वसतिग्रहात धुडगूस घातल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे.

काल रात्री वसतिग्रह क्रमांक ९ मध्ये हा संतापजनक प्रकार घडल्याचे समोर येत असून मिळालेल्या माहितीनुसार,रात्री ११ वाजता स्टूडेंट फ़ेडरेशन ऑफ इंडिया चा विद्यापीठ अध्यक्ष सतीष देबडे याने दारू पिउन वसतिग्रहात धुडगूस घातला . त्याने वसतिगृहाच्या रूमच्या खिडकिच्या काचा फोडल्या . या गोंधळानंतर विद्यापीठाचे सुरक्षा विभाग, वसतीगृहाचे अधिकारी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाले.

याबाबत वसतीगृह अधिकारी टी.डी निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री अकरा वाजता एसएफआयचा विद्यापीठ अध्यक्ष सतीश देबरे याने वसतीगृहात गोंधळ घातला. त्याने खोलीच्या काचा फोडल्या. यात त्याच्या हातला जखम झाली. घटनास्थळी त्याचे रक्त पडले होते. त्याला उपचाराबाबत विचारले असता त्याने उपचाराची गरज नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे या सगळ्या प्रकारानंतर सतीष देबडे याच्यावर विद्यापीठाने अजून कोणतीही कारवाई केली नाही.

झालेला प्रकार हा अतिशय निंदनीय असून या प्रकारानंतर विद्यापीठ वसतीगृहातील मुलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकाराची चौकशी तसेच ब्लड टेस्ट करुन देबरे याच्यावर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय विद्याथी परिषद करणार असल्याचे अभाविपचे विद्यापीठ अध्यक्ष श्रीराम कंधारे यांनी सांगितले. तर माझ्याकडून अनवधानाने काच फुटली असून जे माझ्यावर आरोप लावण्यात आले आहेत यात कसल्याही प्रकारचे तथ्य नाही. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तसेच ब्लड टेस्टसाठी देखील तयार असल्याचे सतीष देबडे याने महाराष्ट्र देशा बरोबर बोलताना सांगितले.