fbpx

नवा व्हिडीओ ;  धोकेबाज बाॅयफ्रेंडच्या घराबाहेर डीजे लावून तरुणीचा राडा !

टीम महाराष्ट्र देशा- ब्रेकअप झालेली व्यक्ती काहीही करू शकते,याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. आणि आपल्याला माहितच आहे ‘प्रेमात आणि युद्धात सगळं माफ आहे’. मग अशा हृदय तुटलेल्या लोकांनी काहीही केलं तरी त्या गोष्टीकडे अगदी सहानभुतीने पाहिलं जातं. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धोका देणाऱ्या बॉयफ्रेंडच्या घराबाहेर डीजे लावून मद्यधुंद तरुणीनं राडा घातल्याची घटना सोशल मीडियावर व्हायरल झालीय. व्हिडिओमध्ये एक तरुणी दारु पिऊऩ डीजेसमोर डान्स करताना दिसत आहे.
खबर एनडीटीव्ही डॉट कॉम या बेवसाईटने दिलेल्या माहितीनुसार दारू प्यायलेल्या मुलीने या व्हिडिओत एका बॉलिवूड गाण्यावर डान्स केला आहे. तसेच  संदीप सहवाग नावाच्या फेसबुक युझरने यासंदर्भातील व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केलेत. या तरुणानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, “गुरुग्रामच्या पटौदी शहरातील हेलमंडीमध्ये एका तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडच्या घराबाहेर डीजे लावून डान्स केला. बॉयफ्रेंडनं धोका दिल्यानं तीने हे कृत्य केलंय” 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे. पण याची कुणीही सत्यता पडताळलेली नाही. पण हा व्हिडीओ खरा असल्याचं समजून अनेक फेसबुक यूजर्स आपपल्या मित्रांना टॅगही करत आहेत.हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण अद्याप हा व्हिडीओ कुठला आहे, याची माहिती मिळालेली नाही.