कोरोना टेस्ट प्रमाणेच ड्रग्स टेस्ट झाली पाहिजे सर्वांच्या रक्तातून ड्रग्स निघणारच निघणार : राखी सावंत

rakhi sawant

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहला ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ने अटक केल्यानंतर टीव्ही विश्वात मोठी खळबळ माजली आहे. अमली पदार्थ प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला. किल्ला कोर्टाने 15000 रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला. अटक झाल्यानंतर भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांनी जामिनासाठी किल्ला कोर्टात अर्ज दाखल केला होता. त्यांच्या या जामीन अर्जावर आज (23 नोव्हेंबर) सकाळपासून सुनावणी सुरू होती.

यावरच आता नेहमी आपल्या बेधडक स्वभावामुळे चर्चेत राहणारी राखी सावंतने भारती आणि हर्षचं नाव ड्रग्स केसमध्ये येण्यावरून एक मोठं वक्तव्य केलं आहे. राखीने प्रश्न उपस्थित केला की, फक्त फिल्म इंडस्ट्रीतील लोकांचीच नावे ड्रग्स केसमध्ये का समोर येत आहेत. एखाद्या मंत्र्याच्या मुलाचं नाव का समोर येत नाही?

राखीने सांगितले की, तिला विश्वास बसत नाहीये की, भारतीसोबत असं होऊ शकतं. कारण भारती भारतातील नंबर १ कॉमेडीअन आहे. राखी म्हणाली की भारती आणि हर्ष माझे जवळचे मित्र आहेत. तसेच राखीने एनसीबीच्या कामाचंही कौतुक केलं आहे. राखी म्हणाली की, एनसीबी एजन्सी फार चांगलं काम करत आहे. मला तर वाटतं एकाएकाला नार्को टेस्टसाठी पाठवलं पाहिजे. सर्वांचं रक्त चेक करायला पाहिजे. ज्याप्रकारे कोरोनाची टेस्ट लीगल झाली आहे तशीच लोकांची ड्रग टेस्ट झाली पाहिजे. सर्वांच्या रक्तातून ड्रग्स निघणारच निघणार.

महत्वाच्या बातम्या