ड्रग्स प्रकरण बॉलीवूड कडून क्रिकेटकडे ? शाहरुख खानच्या टीम वर आरोप…

kknr

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बरेच जण समोर आले, सुशांत सिंह प्रकरणामध्ये अमली पदार्थ सेवन करणाऱ्या अभिनेता व अभिनेत्री हे प्रकरण सुद्धा समोर आले, सुशांत सिंग प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे दरम्यान नव नवीन सत्य समोर येत आहेत. NCB ने या प्रकरणात अमली पदार्थ सेवन कनेक्शन शोधून काढले आणि अनेक जणांना अटक केली आहे.

सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला अमली पदार्थ प्रकरणी अटक झाल्यानंतर चौकशीमध्ये अनेक नवीन नावे उघडकीस आली आहेत.यामध्ये बऱ्याच अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. दरम्यान रियाच्या वकिलाने अशी माहिती दिली आहे कि रिया ने कोणत्याही अभिनेता व अभिनेत्रींचे नाव घेतले नाही.

याचदरम्यान आता अमली पदार्थ सेवन प्रकरण बॉलीवूड कडून क्रिकेट कडे वळाले आहे. शर्लिन चोप्राने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखती मध्ये असे सांगितले कि IPL मध्ये सुद्धा अश्या पार्ट्या केल्या जातातं तिने असे सांगितले की ‘कोलकाता नाईट राईडर’ या IPL संघाचीही रेव्ह पार्टीचं असते. या पार्टी मध्ये अमली पदार्थाचे सेवन केले जाते. या पार्ट्या मध्ये क्रिकेटर सोबत त्यांच्या पत्नी, स्टार्स अमली पदार्थांचं सेवन करतात. शाहरुख खान कसा आहे हे आपल्या सगळ्यांचं माहित आहे. असा आरोप शर्लिन चोप्राने केला आहे.व ‘नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोला’ या सगळ्याची कबुलीही देणार असही तिने दर्शविले आहे.

सुशांत निधन प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे दरम्यान नवीन नवीन सत्य समोर येत आहे. NCB ने या प्रकरणात अमली पदार्थ सेवन कनेक्शन शोधून काढले आणि अनेक जणांना अटक केली आहे.

महत्वाच्या बातम्या :-