औषधांचा सरकारी स्तरावर काळाबाजार? विदर्भ-नागपूरबाबत हेतुपुरस्कर सवती व्यवहार

नागपूर : राज्य सरकार आणि राज्यातले मंत्री विदर्भ आणि नागपूरबाबत हेतुपुरस्कर सवती प्रमाणे व्यवहार करत असल्याची टीका भाजपचे नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. नागपूरमध्ये कोरोना रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा होत नाही. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना भटकंती करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय.

राज्यातले वजन असलेले मंत्री त्यांच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा करत आहेत. इतर जिल्ह्यांना मात्र, हेतुपुरस्कर औषधांचा पुरवठा केला जात नसल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. या संदर्भात आपल्याकडे पुरावे असल्याचेही ते म्हणाले. ठाणे जिल्ह्यात एका रुग्णाना दोन रेमडेसिविर इंजेक्शन दिले जात आहे. तर नागपूर जिल्ह्यात दोन रुग्णांना एक इंजेक्शन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाड्यातील नेत्याचे नाव न घेता, एका नेत्याने २० हजार इंजेक्शन आपल्या जिल्ह्यासाठी वळती करून घेतले असल्याचे ते म्हणाले.

एकूणन रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन आणि औषधांच्या बाबतीत सरकारी स्तरावर काळाबाजार होत असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्या जिल्ह्यांना तुम्हाला जास्त औषधांचा पुरवठा करायचा आहे, तो खुशाल करावा. मात्र, नागपूर आणि विदर्भाची जेवढी मागणी आहे, त्या प्रमाणे तरी पुरवठा करा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP