#होरपळतोय महाराष्ट्र : लातूरमध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांनी केली सरपंचाला मारहाण

टीम महाराष्ट्र देशा : राज्यभरात सध्या भीषण दुष्काळ पडल्याचे चित्र आहे. नागरिक भीषण पाणीटंचाईला तोंड देत आहेत, असे असले तरीही पाणीटंचाईवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था अथवा लोकप्रतिनिधींकडून सध्यातरी कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याचे समोर येत आहे.

Loading...

लातूरमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. जिल्ह्यातील हालसी गावात पाणीप्रश्नामुळे सरपंचास ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. हालसी गावासाठी शासकीय तीन विंधन विहिरी मंजूर झाल्यात मात्र त्या दोनशे फुटापेक्षा जास्त घेता येत नाहीत. यामुळे तीस हजार खर्चून पुढील काम करावे असे ठरले होते. त्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येत तीस हजार रुपयांची लोकवर्गणी गोळा केली. मात्र सरपंच राजू गंगथडे यांनी मात्र आचारसंहितेचे कारण देत काम केले नाही. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सरपंचास बेदम चोप दिला.

दरम्यान, दुष्काळी कामांना आचारसंहिता लागू नाही, निवडणूक आयोगाने दुष्काळी कामे करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आचारसंहितेचे कारण देऊन दुष्काळावरील उपाययोजनांची कामे प्रलंबित ठेऊ नयेत, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या सरपंचावर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.Loading…


Loading…

Loading...