दुष्काळ निवारण बैठकीत आ.बबनदादा शिंदे यांनी अधिकाऱ्यांना झापले

कुर्डूवाडी प्रतिनीधी/ हर्षल बागल-  माढा तालुका दुष्काळ निवारण बैठकीत विविध योजना अाणी पाणी टंचाई आढावा बैठकित रखडलेल्या कामांमुळे माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार बबनदादा शिंदे यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना भर बैठिकत झाप-झापले . अनेकवर्षापासुन काही योजना व त्यांचे ऊद्दिष्ठ पुर्ण का होत नाही म्हणुन समोरासमोरच आ. शिंदे यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. तालुक्यात येणाऱ्या काळात भीषण दुष्काळ जाणवणार आहे. आत्तापासुनच सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाला लागावे. अशा सुचना आ. शिंदे यांनी दुष्काळ आढावा बैठकित बोलताना सागिंतले.

पुढे बोलताना आ. शिंदे म्हणाले की सर्व अधिकाऱ्यांनी मागिल दुष्काळाचा अभ्यास करावा आणि सर्वांनी मिळुन दुष्काळाचा सामना करावा. एकही योजना प्रलंबीत राहु देऊ नका , एकाही गावाला दुष्काळाची झळ बसु देऊ नका , योजना रखडल्या तर परत परत मी सांगणार नाही असा सज्जड दम थेट आ. शिंदे यांनी दिला.
यावर्षी पाऊसाळ्यात जेवढा पाऊस पडायला पाहिजे तेवढा पडला नाही , एकुण सरासरी 543 मि.मी. पाऊस पडायला पाहिजे पण माढा तालुक्यात केवळ सरासरी 153 मि.मी. पाऊस पडला आहे. त्यामुळे तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थीती असल्याचे स्पष्टीकरण तहसिलदार सदाशिव पडदुणे यांनी सांगतिले.

मनरेगा , रोजगार हमी योजना गावागावात राबवा , ज्या गावांना टँण्कर ची गरज आहे त्यांनी प्रस्ताव पाठवावेत , तलाठी ग्रामसेवक , कृषीअधिकारी , यांना अशा सुचना प्रांतअधिकारी बोरकर यांनी केल्या.

या बैठकीला माढा तालुका सभापती विक्रमदादा शिंदे , ऊपसभापती बाळासाहेब शिंदे , जि.प. सदस्य रणजित शिंदे, आप्पासाहेब ऊबाळे , पं.स सदस्य शहाजी शिंदे , सुरेष बागल , शिवाजी पाटिल , शंभु मोरे ऊपस्थित होते. यांचायासह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी , ग्रामसेवक , तलाठी , कृषी सहायक अधिकारी ऊपस्थित होते.