दुष्काळ पाहणी पथक आज बीड मध्ये

पुणे जिल्ह्यातल्या 7 तालुक्यात मध्यम दुष्काळ

टीम महाराष्ट्र देशा – राज्यातल्या दुष्काळ सदृश भागाची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या दहा सदस्यांच्या शिष्टमंडळानं काल औरंगाबाद, जालना, बुलडाणा, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांचा दौरा केला. दरम्यान पुणे महसूल विभागातले सांगली, सातारा आणि पुणे जिल्हा; तसंच बीड जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी हे पथक आज येत आहे. पुणे जिल्ह्यातल्या 7 तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर झाला आहे. आज पाहणी करून उद्या हे पथक दिल्लीला रवाना होईल.

Rohan Deshmukh

या पथकात एकंदर 10 सदस्यांचा समावेश आहे. या सदस्यांचे तीन गट करण्यात येणार असून ते मराठवाडा, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुक्यांना भेटी देऊन तिथल्या पीक परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

या पथकातील सदस्य तिथल्या शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून पिकांच्या नुकसानाची माहिती घेणार आहेत राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यापूर्वीची सर्वसाधारण भेट आहे. राज्य सरकारकडून या पथकातील सदस्यांना पर्जन्यमानाची आकडेवारी, प्रत्येक भागात घेतल्या जाणार्याट पिकांची माहिती तसंच यापूर्वी स्थानिक महसूल अधिकाऱ्यांनी तयार केलेले पीक परिस्थिती पाहणीचे अहवाल यांची माहिती देण्यात येईल असंही या सूत्रांनी नमूद केलं. राज्य शासनानं सुमारे 151 तालुक्यात दुष्काळसदृश्य स्थिती असल्याचं यापूर्वीच जाहीर केलं आहे.

भाववाढीचे गाजर दाखवत सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केलीय- अजित पवार

Latur Advt
You might also like
Comments
Loading...