#होरपळतोय महाराष्ट्र : वर्ध्यात कारागृहातील कैदी पाणीटंचाईने त्रस्त

टीम महाराष्ट्र देशा : राज्यभरात सध्या भीषण दुष्काळ पडल्याचे चित्र आहे. नागरिक भीषण पाणीटंचाईला तोंड देत आहेत, असे असले तरीही पाणीटंचाईवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था अथवा लोकप्रतिनिधींकडून सध्यातरी कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याचे समोर येत आहे.

वर्धा जिल्ह्यात यंदा दुष्काळाने डोके वर काढले आहे. जिल्ह्यतील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अशातच जिल्हा कारागृहातील कैदीदेखील पाणीटंचाईने त्रस्त आहेत. वर्धा कारागृहात १५० वर्षांमध्ये पहिल्यांदाच पाणीटंचाईच्या झळा कैद्यांनाही सोसाव्या लागत आहे. या कारागृहात जवळपास ३५० कैदी आहेत. कारागृहात एकूण ६ विहिरी आहेत. त्यापैकी ३ विहिरी कैद्यांना पाणी पुरवठ्यासाठी आहेत. पण, या विहिरीत पाणी नसल्याने कारागृहात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

Loading...

दरम्यान, पालिकेकडून टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, तो गरजेपेक्षा कमी आहे. पाण्याअभावी बाथरुमची सफाई करणेही शक्य होत नाही. पाण्याच्या या टंचाईने कैद्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत