होरपळतोय महाराष्ट्र : प्रशासनाच्या उदासीनतेमुळे उदगीर तालुक्यात भीषण पाणी टंचाई

Drought in Maharashtra

उदगीर/ प्रतिनिधी : उदगीर शहरात पंधरा ते वीस दिवसाला एक वेळा पाणी पुरवठा होत असून, तालुक्यात ५० गावे भीषण पाणीटंचाईला तोंड देत आहेत असे असले तरीही पाणीटंचाईवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था अथवा लोकप्रतिनिधींकडून सध्यातरी कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याचे चित्र आहे. पाण्याचे टँकर आणि विहीर, बोअर अधिग्रहणाची मागणी मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडे होत आहे. त्यामुळे दुष्काळात सर्वसामान्य नागरिक पाण्यासाठी होरपळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

उदगीर तालुक्यांमध्ये दरवर्षी होणाऱ्या पावसाचे प्रमाण कमी होत आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचे दिसून येते. उन्हाळ्याच्या दिवसांत वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असून दररोज अनेक लाकडांचे ट्रक उदगिरातील लाकडी कटाई करणाऱ्या कारखान्यावर कटाईसाठी येत असल्याचे दिसून येते. त्यामुळे उदगीर तालुक्याची वाटचाल वाळवंटाकडे होत आहे. ही वृक्षतोड थांबविण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था या कधीही पुढे येत नाहीत.

Loading...

गतवर्षीच्या पावसाळ्यात उदगीर तालुक्यांमध्ये सरासरीच्या ५० टक्के इतकाच पाऊस झाला आहे. तालुक्यातील सर्व तलाव, विहिरी या हिवाळ्यातच कोरड्या पडल्या आहेत. प्रत्येक वर्ष-दोन वर्षांनी अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण होणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना होणे गरजेचे आहे. परंतु सततच्या दुष्काळाकडे आणि होत असलेल्या कमी पर्जन्यमान याकडे साऱ्यांचेच दुर्लक्ष होत आहे.

पावसाळा आला की, वृक्ष लागवडीचे कागदोपत्री उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची धावपळ असते. परंतु लावण्यात आलेली रोपे किती जगली, याकडे कुणीही पाहात नाही.पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्यासाठी कुठल्याही लोकप्रतिनिधींकडून सामाजिक संस्थांकडून किंवा प्रशासनाकडून म्हणावे तसे प्रयत्न होताना दिसून येत नाहीत.

तालुक्यातील अनेक गावांत भीषण पाणीटंचाईचा सामना करत असताना भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी गावपातळीवरील लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जलपुनर्भरण, वृक्षलागवड, जलयुक्त अभियान हे प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. परंतु हे सर्व उपक्रम उत्सव साजरा केल्याप्रमाणेच राबविले जातात. भविष्यात दुष्काळ व पाणीटंचाई निर्माण होणार नाही, यासाठी सर्वांनी गांभीर्याने याची दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.

पशु – पक्षी पाण्याच्या शोधात

उदगीर तालुक्यातील अनेक विहिरी, तलाव या कोरड्या पडल्या आहेत. परिसरातील सर्वच जलस्त्रोत पूर्णपणे आटल्याने अनेक पक्षी, प्राणी हे पाण्याच्या शोधात गावाजवळ भटकत असतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. या तीव्र उष्णतेमुळे माणसांबरोबरच मुकी जनावरे, प्राणी-पक्षी यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार
मराठा क्रांती मोर्चाचा पहिला बळी ' मी ' ठरलो : आमदार भारत भालके
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश