fbpx

आता दुष्काळाच्या तक्रारी थेट मुख्यमंत्र्यांकडे नोंदवा, ‘हा आहे क्रमांक’

टीम महाराष्ट्र देशा :राज्यात सध्या भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे आता तुम्ही दुष्काळाच्या तक्रारी थेट व्हॉट्सअॅपवरून मुख्यमंत्र्यांकडे नोंदवू शकता.

राज्यात पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती गंभीर आहे. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यासाठी सरकारने ८८७९७३४०४५ हा व्हॉट्सअॅप क्रमांक जारी केला आहे. या क्रमांकावर दुष्काळाशी संबंधित तक्रारी, मागण्या थेट माझ्यापर्यंत पोहोचतील. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार त्यावर तत्काळ कार्यवाही करावी तसेच त्याचा अहवाल आपल्याला पाठवावा, अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, विरोधकांकडून दुष्काळाबाबत राज्य सरकार गाफील आहे अशी टीका करण्यात आली होती. परंतु केंद्राकडून एकूण ४२४८.५९ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारला मिळाला आहे. त्यामुळे सरकार दुष्काळ निवारणासाठी तयार असल्याच दिसत आहे.