ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी

मुंबई : – राज्यात ऊस पिकाच्या अतिरिक्त उत्पादनामुळे दुष्काळाचे संकट ओढवल्याची चर्चा कायमच सुरू असते, त्यामुळे सरकारने सकारात्मक धोरण म्हणून उसाला ठिबक सिंचन बंधनकारक केले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती केली जाते. मात्र ऊसाला पाणी देण्यासाठी पाईपलाईन किंवा थेट पाट पाडून पाणी दिलं जातं. मात्र यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जातं. तसंच जमिनीची धूपही होते.त्यामुळे ऊस लागवडीसाठी आता ठिबक सिंचन गरजेचं असेल. यापुढे तुम्हाला ऊस लागवड करायची असेल, तर त्यासाठी ठिबक सिंचन बंधनकारक असेल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकार ठिबक सिंचनाला 25 टक्के अनुदान देणार आहे. या निर्णयाने मोठया प्रमाणावर पाण्याची बचत होईल, असा दावा करण्यात येत आहे.
जास्त पाणी आणि कमी उत्पादन हे सूत्र बदलण्यासाठी सरकारने जालीम उपाय शोधला आहे. ऊस शेतीसाठी आता ठिबक सिंचन बंधनकारक असेल ठिबक सिंचनामुळे आवश्यकतेनुसार पिकाला पाणी मिळेल, तसंच मोठ्या प्रमाणात वाया जाणाऱ्या पाण्याचीही बचत होईल.

राज्यातील ऊस पिकाखालील ३ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी या विशेष  योजनेस मंजुरी देण्यात आहे .