Share

Drinking Water Rules | पाणी किती, कोणतं, कसं आणि केव्हा प्यायचं? जाणून घ्या आयुर्वेदात नेमकं काय लिहिलंय

पाणी किती, कसं, केव्हा प्यावं? Drinking Water Rules

तहान लागेल तेव्हाच, लागेल तेवढंच थोडे थोडे पाणी पिणे आपल्या शरीरासाठी योग्य आहे. खूप तहान लागते म्हणून एकाच वेळी तांब्याभर पाणी पिणे योग्य नाही कारण तहान ही संवेदना जिभेला व घशाला होत असते पोटाला नाही! म्हणून कडक भूके प्रमाणे कडक तहान लागल्यानंतरच पाणी हे घोट घोट बसून ग्लासला तोंड लावून प्यावे. तोंडामध्ये काही वेळ धरून त्यात लाळ मिसळू द्यावी आणि मग प्यावे असे केल्यानंतर अगदी कमी प्रमाणात सुद्धा पिलेल्या पाण्यामुळे तहान भागते आणि ते पाणी पचायलाही सोपे जाते..

गरजेपेक्षा जास्त पाणी पिले तर काय होते?

गरजेपेक्षा जास्त पाणी पिले तर आणि एकाच वेळी भरपूर पाणी प्यायल्याने शरीर स्वच्छ होण्यापेक्षा किडनी वरचा ताण वाढतो व शरीराची जास्त शक्ती हे पाणी पचवण्यात खर्च होते आणि तरीही न पचलेले पाणी शरीराच्या विविध अवयवांच्या पेशीत साठून राहते व त्यामुळे वजन वाढणे, कडकडून किंवा खरी भूक न लागणे, पासून ते थायरॉईड, स्थौल्य, डायबिटीज इत्यादी आजार निर्माण होतात. कारण हे पाणी शरीरात साठुन राहिले की आंबण्याची प्रक्रिया सुरू होते. बाहेर साठलेल्या सांडपाण्यात ज्याप्रमाणे डास किंवा इतर आळ्या होतात त्याप्रमाणे शरीरामध्ये सुद्धा कृमींची (जंत) उत्पत्ती होते. विशेषतः लहान मुलांमध्ये अतिरिक्त कफ तयार होऊन बऱ्याच आजारच कारण बनताना आढळून येते. लहान मुलांमध्ये सर्दि, छातीत कफ साठने, भूक न लागणे, पोटात जंत होणे व त्यामुळे चेहऱ्यावर पांढरे डाग व चट्टे पडणे.

झोपताना पाणी पिणे योग्य की अयोग्य?

आपल्यापैकी अनेकांना झोपतांना पाणी पिण्याची सवय असते. सवयीचा भाग म्हणून किंवा कुठेतरी चूकीची माहिती ऐकून झोपताना तहान नसतानाही पाणी पिण्यामुळे वारंवार सर्दी होणे, केस फार गळणे, नाक ,कान, घसा, डोके यांच्या अनेक प्रकारच्या तक्रारी उद्भवतात. जेवण सूर्य मावळन्या पूर्वी किंवा साडेसात पूर्वी होत असेल तर झोपण्यापूर्वी अर्धा तासापर्यंत तहने च्या प्रमाणात पाणी पिण्यास हरकत नाही.

जेवतांना पाणी पिण्याचे नियम-

जेवण सुरू असतानाच प्रत्येक चार-पाच घासानंतर घोट -घोट पाणी पिण, जेवणानंतर चूळ भरून 2-4 घोट जास्तीत जास्त अर्धा कप पाणी प्यावे.अशा प्रकारे पूर्ण जेवणात अर्धा ते एक ग्लास पाणी घ्यावं.

याउलट जेवतांना एकही घोट पाणी न पिणे आणि जेवण झाल्यानंतर लगेच किंवा अर्ध्या- एक तासांनी भरपूर पाणी पिणं हा प्रकार चुकीचा आहे. असे केल्याने खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही. त्यामुळे अन्न आंबण्याचा प्रकार १००% होतोच. जेवण झाल्यानंतर कमीत कमी दोन ते तीन तास पाणी पिऊ नये, आणि जेवणाआधी कमीत कमी अर्धा तास तरी पाणी पिऊ नये असे केल्यास अन्न पचन व्यवस्थित होते. भाजी भाकरी कुस्करून खाण्याच्या सवयीमुळे गरजेपेक्षा जास्त पाणी जेवणात जात नाही.

सकाळी अनुश्यापोटी पाणी पिण्याचे नियम-

1. सकाळी गरम पाणी मध एकत्र पिण शरीरासाठी घातक आहे. कारण मध व दही कधीच गरम पदार्थात मिसळून किंवा गरम करून घेऊ नये. असे केल्यास शरीरावर वाईट परिणाम होतात.

2. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायचे असेल तर ,सकाळी सूर्योदयाच्यावेळी ठेवून संध्याकाळपर्यंत ते पाणी प्यावे कारण या पाण्यावर सूर्यप्रकाशाचा संस्कार होणे गरजेचे असते. रात्री तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यावर सूर्यप्रकाशाचा संस्कार होत नाही व ते शरीरासाठी अपायकारक ठरते.

3. उन्हाळ्याचे तीन महिने- मार्च, एप्रिल, मे व पावसाळ्यानंतर चे दोन महिने- सप्टेंबर व ऑक्टोबर या काळात सकाळी अनुश्यापोटी ओंजळभर थंड (फ्रिज मधले नाही) पाणी प्यावे किंवा धन्याचे प्यावे. असे केल्यास शरीरातील उष्णता वाढत नाही.

4. पावसाळ्याचे दोन महिने उकळून कोमट केलेले पाणी सकाळी अनुश्यापोटी व दिवसभर प्यावे.

5. हिवाळ्यामध्ये सकाळी अनुश्यापोटी कोमट पाणी प्यावे.

एवढ्या नियमांना पाळून कमी पाणी पिलं म्हणून जर लघवीला जळजळ होत असेल तर याचं कारण शरीरातील वाढलेली उष्णता किंवा वाढलेले पित्त असू शकते. त्यासाठी पाण्याचे प्रमाण वाढवण्याऐवजी सकाळी धने जिरे उकळून ते पाणी दिवसभर पिऊ शकतो . त्यासाठी जास्त पाणी पिणं हा उपाय योग्य नाही. किंवा आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवून योग्य सल्ला घ्यावा.

सामान्यतः ज्यांना रात्री लघवी साठी उठावे लागते किंवा “कधी खाईन…” अशी कडक भूक लागत नाही त्यांच्या शरीरात गरजेपेक्षा जास्त पाणी आहे असे समजावे. त्यांनी वरील नियमांचे नक्की पालन करावे.

जे लोक कष्टाची कामे करतात किंवा व्यायाम जास्त करतात त्यांना घामही जास्त येतो. अश्या लोकांना पाण्याची गरज जास्त असते.

तुम्हाला वारंवार तहान लागते का???

आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत ज्यांना वारंवार तहान लागते. एकावेळी तांब्याभरून पाणी पिऊन देखील तहान भागत नाही. अश्यांनी पाणी नेहमी बसून प्यावे. तसेच ज्या भांड्याने पाणी पितो (ग्लास) त्याला तोंड लावून पाणी प्यावे कारण वरून पिलेले पाणी जिभेला लागलेल्या तहानेची पूर्णत: तृप्ती करू शकत नाही. तहान न भागल्याने शरीरातील उष्णता वाढते. शरीरातील उष्णता वाढलेल्या लोकांना पुन्हा-पुन्हा तहान लागते. व हे चक्र असेच चालू राहते. (अन्नही असेच मन लावून बारीक चावून खाल्ल्यास अन्नात लाळ व्यवस्थित मिसळते. जीभ तृप्त होते व पचनाचे आजार मुळीच होत नाहीत)

पिण्यासाठी योग्य पाणी-

पावसाचं पाणी जमिनीवर पडण्यापूर्वी हवेतच पात्रात धरून काचेच्या बाटल्या मध्ये साठवावे व हे पाणी पिण्यासाठी सर्वश्रेष्ठ सांगितलेले आहे. ज्या पाण्याला सूर्यप्रकाश आणि वाऱ्याचा स्पर्श होतो ते(झऱ्याचे, स्वच्छ वाहत्या नदीचे पाणी) किंवा आडाचे, विहरीचे पाणी पिण्यासाठी चांगलं हे पाणी आरोग्यदायी असते.

बोरवेल आणि बिसलेरी च पाणी पिण्यास किंवा पचण्यास योग्य समजावं का?

बोरवेलचे पाणी फिल्टरला जोडण्या पेक्षा सकाळच्या स्वच्छ हवेत व कोवळ्या उन्हात एका भांड्यातून दुसर्‍या भांड्यात वर खाली करून शक्यतो उकळून किंवा तापवून पिण्यासाठी वापरावे म्हणजे ते पचण्यास हलके होईल व पाण्यातील क्षार यांचा कीडनीवर ताण येणार नाही.

अजीर्ने भैषजं वारी, जीर्ने वारी बलप्रदम् |
भोजने च अमृतम् वारी, भोजन अंते विषप्रदं||
खाल्लेले अन्न पचले नसेल तर फक्त पानी पित राहणे औषध ठरते, अन्नपचन झाल्यानंतर पिलेले पाणी बलदायक ठरते. जेवताना मध्येमध्ये पिलेले पाणी (थोडे थोडे) अमृतासारखे आहे म्हणजेच स्वास्थ्य निर्माण करणारे आहे व जेवणानंतर पाणी पिणे विषासारखे आहे म्हणजेच रोग निर्माण करणारे आहे.

महत्वाच्या बातम्या :

पाणी किती, कसं, केव्हा प्यावं? Drinking Water Rules तहान लागेल तेव्हाच, लागेल तेवढंच थोडे थोडे पाणी पिणे आपल्या शरीरासाठी योग्य …

पुढे वाचा

Health Maharashtra

Join WhatsApp

Join Now