Share

Health Care | जास्त पाणी प्यायल्याने शरीराला होऊ शकतात ‘हे’ नुकसान

Health Care | टीम महाराष्ट्र देशा: पाणी (Water) आपल्या आरोग्यासाठी (Health) खूप आवश्यक असते. पण तुम्हाला माहित आहे का? पाण्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीराला अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. जास्त पाणी प्यायल्याने शरीरात सोडियम आणि इलेक्ट्रोलाईटची कमतरता निर्माण होते. त्यामुळे किडनीवर परिणाम होतो. त्याचबरोबर जास्त पाणी पिल्याने शरीरात ओव्हरहायड्रेशनची समस्या निर्माण होते. त्यामुळे दिवसभरातून शरीराला हवे तेवढेच पाण्याचे सेवन केले पाहिजे. अतिरिक्त पाण्याचे सेवन केल्याने शरीराला पुढील नुकसान होऊ शकते.

पोटाच्या समस्या

जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने पोट फुगण्याची समस्या निर्माण होते. त्याचबरोबर उलट्या आणि डोकेदुखीचा त्रास देखील निर्माण होतो. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे टाळावे. गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने प्रकृती गंभीर होण्याची शक्यता अधिक असते.

किडनीच्या समस्या

जास्त प्रमाणात पाण्याचे सेवन केल्याने किडनीवर परिणाम होतो. पाणी प्यायल्याने ओवरहायड्रेशन होते. त्यामुळे किडनी खराब होण्याची शक्यता अधिक वाढते. म्हणून शरीराला हवे तेव्हाच पाण्याचे सेवन केले पाहिजे.

हृदयाच्या समस्या

अतिरिक्त पाण्याचे सेवन केल्याने हृदयाची संबंधित समस्या वाढू शकतात. कारण जास्त पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. याचा थेट परिणाम हृदयावर होतो. त्यामुळे हृदय निकामी होण्याची शक्यता वाढू शकते. पाण्याचे अति सेवन करणे हृदयासाठी धोकादायक ठरू शकते.

सूज येण्याची समस्या निर्माण होते

जास्त पाणी प्यायल्याने शरीरात सूज येऊ शकते. जास्त सूज शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. त्याचबरोबर जास्त पाणी प्यायल्याने मेंदूचे नुकसान होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे जास्त पाण्याचे सेवन करणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

महत्त्वाचे – शरीर निरोगी ठेवण्यासाठी दिवसातून तीन लिटर पेक्षा जास्त पाणी पिऊ नये. त्याचबरोबर तहान लागल्याशिवाय पाणी पिऊ नये. निरोगी राहण्यासाठी एकाच वेळी पाणी पिण्याऐवजी घोट-घोट पाणी प्यायले पाहिजे.

टीप: वरील माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Health Care | टीम महाराष्ट्र देशा: पाणी (Water) आपल्या आरोग्यासाठी (Health) खूप आवश्यक असते. पण तुम्हाला माहित आहे का? पाण्याचे …

पुढे वाचा

Health

Join WhatsApp

Join Now