Share

Health Care Tips | हिवाळ्यामध्ये थंड पाणी प्यायल्याने शरीरात निर्माण होतील ‘या’ समस्या

Health Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये अनेक लोक गरम पाण्याऐवजी थंड पाणी पिणे पसंत करतात. पण तुम्हाला माहित आहे का? हिवाळ्यामध्ये थंड पाणी पिल्याने शरीराला अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आरोग्याची (Health) काळजी घेण्यासाठी थंड पाणी पिणे टाळले पाहिजे. हिवाळ्यामध्ये थंड पाण्याचे सेवन केल्याने सर्दी, खोकला, कफ यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीमध्ये कोमट पाणी पिऊन तुम्ही या समस्यांवर मात करू शकतात. थंड पाणी पिल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. त्याचबरोबर पचनक्रियाही बिघडू शकते. त्यामुळे शरीर सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी नियमित कोमट पाण्याचे सेवन करावे. हिवाळ्यामध्ये थंड पाणी प्यायला पुढील समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

सर्दी-खोकल्याची समस्या निर्माण होते

हिवाळ्यामध्ये थंड पाणी प्यायल्याने सर्दी-खोकल्याचा त्रास वाढू शकतो. हिवाळ्यामध्ये बदलत्या वातावरणात तुमची सर्दी जर बऱ्याच काळ बरी होत नसेल, तर तुम्ही कोमट पाण्याचे सेवन केले पाहिजे. कोमट पाण्याचे सेवन केल्याने, तुम्ही या थंड वातावरणात मोसमी आजारांपासून दूर राहू शकतात.

पचनसंस्थेत समस्या निर्माण होतात

हिवाळ्यामध्ये थंड पाणी प्यायल्याने पचनसंस्थेत अनेक समस्या निर्माण होतात. थंड वातावरणामध्ये थंड पाणी प्यायल्याने रक्तपेशी आकसतात. परिणामी अन्न पचण्यास समस्या निर्माण होतात. थंड पाणी प्यायल्याने पचनक्रियेची गती मंद होते. त्यामुळे शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी कोमट पाण्याचे सेवन केले पाहिजे.

डोकेदुखी वाढते

हिवाळ्यामध्ये थंड पाण्याचे सेवन केल्याने डोकेदुखीचा त्रास वाढू शकतो. थंड पाण्यामुळे मणक्याच्या नसा थंड होतात. या नसा थंड झाल्यावर डोके दुखायची समस्या अधिक वाढते. त्यामुळे या हिवाळ्यात डोकेदुखीच्या समस्या पासून दूर राहण्यासाठी कोमट पाण्याचे सेवन करावे.

टीप: वरीलबद्दल संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Health Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये अनेक लोक गरम पाण्याऐवजी थंड पाणी पिणे पसंत करतात. पण तुम्हाला माहित …

पुढे वाचा

Health

Join WhatsApp

Join Now