टीम महाराष्ट्र देशा: शरीर निरोगी राहण्यासाठी डॉक्टर आपल्याला नेहमीच आहारामध्ये फळांचा समावेश करा असे सांगत असतात. आहारामध्ये फळांचा समावेश केला की बरेचसे आजार दूर होतात. आणि शरीर निरोगी राहू लागते. फळांबरोबरच फळांचा रसही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. हंगामानुसार, आपण आपल्या शरीराला फळांची रस दिला पाहिजे. सध्या डाळिंब मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे तर तुम्ही दररोज डाळिंबाचा रस पिऊ शकतात कारण डाळिंबाचा रस तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
दररोज सकाळी रिकाम्या पोटी डाळिंबाचा रस पिल्याने अनेक आजार दूर होऊन शरीर निरोगी राहते. त्याचबरोबर सकाळी रिकाम्या पोटी डाळिंबाचा रस पिल्याने दिवसभर शरीरात ऊर्जा राहते. यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होऊन हिमोग्लोबिन मध्ये देखील वाढ होते. कारण डाळिंबामध्ये शरीराला पोषक असणारी तत्वे आढळून येतात. त्यामध्ये विटामिन के, विटामिन बी, विटामिन ए, विटामिन डी, कॅल्शियम, पोटॅशियम, फायबर आणि प्रोटीन्स इत्यादींचा समावेश होतो.
सकाळी रिकाम्या पोटी डाळिंबाचा रस पिण्याचे फायदे
ॲनिमिया (Anemia) दूर होऊ शकतो.
तुमच्या शरीरात जर आयरनची कमतरता भासू लागली असेल तर तुम्ही ॲनिमिया रोगाचे शिकार होऊ शकतात. डाळिंबामध्ये मुबलक प्रमाणात आयरन उपलब्ध असते. त्यामुळे जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी डाळिंबाचा रस पिला तर तुम्ही ॲनिमिया पासून दूर राहू शकतात.
डाळिंबाच्या रसाने रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते
डाळिंबाच्या रसामध्ये विटामिन सी, विटामिन ए आणि आयरन भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी डाळिंबाचा रस घेतल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. रोगप्रतिकारशक्ती मजबूत झाल्यावर शरीर आजारापासून दूर राहते.
डाळिंबाच्या रसामुळे चेहऱ्यावरील चमक वाढेल
सकाळी रिकाम्या पोटी डाळिंबाच्या रसाचे सेवन केल्यावर तुमच्या चेहऱ्यावरची चमक वाढू शकते. डाळिंबामध्ये अँटी-एक्सीडेंट घटक उपलब्ध असतात ज्यामुळे त्वचा चमकू आणि निरोगी राहू शकते.
डाळिंबाचा रस गरोदर महिलांसाठी आहे विशेष फायदेशीर
महिला गरोदर असताना त्यांच्या शरीरात विटामिन आणि आयरनची कमतरता भासायला लागते. या परिस्थितीत गरोदर महिलांनी सकाळी रिकाम्या पोटी डाळिंबाचा रस नक्की प्यावा.
डाळिंबाचा रस हृदयरोगांपासून दूर ठेवू शकतो
सकाळी रिकाम्या पोटी डाळिंबाचा रस पिल्याने हृदय निरोगी राहू शकते. डाळिंबामध्ये असे काही गुणधर्म आहेत ज्यामुळे कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रणात राहू शकते. त्यामुळे रिकाम्या पोटी डाळिंबाचा रस पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
डाळिंबाच्या रस्त्यामुळे बीपी कंट्रोलमध्ये राहू शकतो
डाळिंबामध्ये पोटॅशियम आढळते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी डाळिंबाचा रस पिल्याने तुमचा बीपी नियंत्रणात राहू शकतो.
टीप : वरील गोष्टींसाठी डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घ्या.
महत्वाच्या बातम्या
- BJP। प्रादेशिक पप्पू होण्यासाठी तुम्ही धडपड करत आहात, आमच्या शुभेच्छा; भाजपाचा पटोलेंवर हल्लाबोल
- Kishori Pednekar | “कोणी एैरा-गैरा नट्टू खैरा…”; मनसेच्या ‘त्या’ पोस्टवर किशोरी पेडणेकर भडकल्या
- Viral Video | लहान मुलाला सिंहासोबत खेळताना बघून व्हाल थक्क! पाहा व्हिडिओ
- NCP | “गेल्या ११ महिन्यांपासून…” ; अनिल देशमुखांचा जामीन मंजूर होताच राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
- Cabinet meeting । शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यातील ७ कोटी लोकांना दिवाळी गिफ्ट पॅकेज जाहीर