अदाणी समुहाविरोधात सुरु असलेली कारवाई ‘डीआरआय’ने थांबविली

नवी दिल्ली : करबुडवेगिरी केल्याप्रकरणी अदाणी समुहाविरोधात सुरु असलेली कारवाई महसुल गुप्तचर संचालनालयाने थांबविली आहे. डीआरआयचे अतिरिक्त महासंचालक व्ही.एस. सिंह यांनी याप्रकरणी आदेश जारी करत कारवाई थांबविण्याचे निर्देश दिले आहेत.

bagdure

अदाणी समुहाकडून आयात करण्यात आलेल्या वस्तूंच्या किंमतीत घोटाळा करणे आणि करबुडवेगिरी करुन सरकारचे आर्थिक नुकसान केल्याचा आरोप अदाणी समुहावर करण्यात आला आहे. समुहातील वीज आणि पायाभूत विकासासाठी आयात करण्यात आलेल्या वस्तूंचे दर वाढवून 3974.12 कोटी रुपये सांगणे आणि त्यावर शून्य किंवा 5 टक्क्यांहून कमी कर दिल्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे.

Comments
Loading...