अमेरिकेत पाकिस्तानच्या पंतप्रधानाचे उतरविले कपडे

वॉशिंग्टन: अमेरिका आणि पाकिस्तानचे संबंध तणावाचे झाले असतानाच, पाकिस्तानच्या पंतप्रधानांची वॉशिंग्टनमधील जे.एफ.केनेडी विमानतळावर चांगलीच बेअब्रू झाली. सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी अमेरिकेच्या दौ-यावर गेले असताना त्यांच्यासोबत ही घटना घडली. आमच्या पंतप्रधानांचा हा अपमान असल्याचं सांगत पाकिस्तानच्या मीडियाने संताप व्यक्त केला आहे.

पाकिस्तानाचे पंतप्रधान शाहीद खाकान अब्बासी यांची बहीण अमेरिकेत राहते. ती सध्या आजारी आहे. तिची विचारपूस करण्यासाठीच अब्बासी खासगी दौऱ्यावर होते. मात्र याच दौऱ्यात त्यांनी अमेरिकेचे उपराष्ट्रपती माईक पेंस यांचीही भेट घेतली. या प्रकारामुळे अमेरिकेचे आणि पाकिस्तानचे सबंध पुन्हा चिघळण्याचे चिन्ह आहेत. तसेच डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानवर व्हिजा बॅन लावण्याच्या विचारात असून याआधी अणूव्यवहाराच्या संशयावरुन पाकच्या ७ कंपन्यांवर अमेरिकेने बंदी घातली आहे.

You might also like
Comments
Loading...