fbpx

‘दाखवलेली स्वप्ने पूर्ण केली नाहीत तर जनता पिटाई करेल’

नितीन गडकरी

टीम महाराष्ट्र देशा : लोकांना स्वप्न दाखवणारे नेते आवडतात. पण दाखवलेली स्वप्न पूर्ण केली नाही तर जनता त्यांची पिटाईदेखील करते. त्यामुळे अशीच स्वप्न दाखवा, जी पूर्ण होतील, असं सूचक वक्तव्य भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी भाजपा प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचा स्थापना कार्यक्रमात बोलून दाखवली आहे.त्यापुढे जाऊन गडकरी म्हणाले,मी स्वप्न दाखवणऱ्या नेत्यांपैकी नाही. पण मी जे बोलतो ते १०० टक्के ‘डंके की चोट पर’ करतो, असं म्हणत अप्रत्यक्षरीत्या मोदींनाच टोमणा मारल्याचे बोलले जात आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपा प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचा स्थापना सोहळा रविवारी पार पडला. शिवसेनेतून भाजपामध्ये आलेल्या हाजी अराफत शेख यांच्या पुढाकारानं भाजपच्या या वाहतूक संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या महिला कार्याध्यक्षपदी ईशा कोप्पीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर ईशा कोप्पीकरला भाजपच्या रस्ते वाहतूक सुरक्षेची ब्रॅण्ड ऍम्बेसेडरही बनवण्यात आली आहे.नितीन गडकरींच्या उपस्थितीत या कार्यक्रमात अभिनेत्री ईशा कोप्पीकर भाजपामध्ये प्रवेश केला.

3 Comments

Click here to post a comment