‘भारतातर्फे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होण्याचे स्वप्न’

भारत

चेन्नई : मोहम्मद सिराज हे नाव २ महिन्यांपूर्वी फारशा लोकांना माहित देखील नसेल पण भारतीय संघानं ऑस्ट्रेलियात कमाल केली आणि सिराजच नाव जगभरातील क्रिकेट रसिकांच्या ओठावर आल. भारतीय संघानं ऑस्ट्रेलियावर मात करत २-१ ने मालिका जिंकली आणि यात मोहम्मद सिराजनं भारताकडून १३ विकेट्स घेतल्या. आणि या ऐतिहासिक विजयाचा पाया रचला.

नुकतंच सिराजने भारतातर्फे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होण्याचे त्याचे स्वप्न असल्याचे स्पष्ट केलं आहे. सिराज म्हणाला,  तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळण्यास उत्सुक असून, सिराजने आपल्या यशाचे श्रेय सहकारी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व ईशांत शर्मा यांना दिले आहे. सिराजने आरसीबीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले, ‘मी ज्यावेळी गोलंदाजी करीत होतो, त्यावेळी जसप्रीत माझ्या मागे उभा असायचा. त्याने मला सांगितले की, आपल्या बेसिक्सवर कायम राहा आणि काही वेगळे करण्याची गरज नाही. त्याच्यासारख्या अनुभवी खेळाडूकडून शिकणे शानदार ठरले.’

तो पुढे म्हणाला, ‘मी ईशांत शर्मासोबतही खेळलो आहे. तो १०० कसोटी सामने खेळला आहे. त्याच्यासोबत ड्रेसिंग रुम शेअर करणे शानदार अनुभव होता. माझे स्वप्न भारतातर्फे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होण्याचे आहे. ज्यावेळी मला संधी मिळेल त्यावेळी मी मेहनत घेईन.’

महत्त्वाच्या बातम्या :