दीपकला ‘या’ कारणामुळे द्रविडने 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले ; उपकर्णधाराने केला खुलासा

cahra

श्रीलंका : भारताची ‘युवा’ टीम सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. शिखर धवनच्या नेतृत्वात आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताने आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तीन विकेटने विजय मिळवला आहे. दुसरा सामना जिंकत टीम इंडियाने मालिकाही खिशात घातली आहे.

भारताला विजयासाठी 276 धावांची गरज असताना पहिल्या आणि मधल्या फळीतील आघाडीचे बॅट्समन स्वस्तात माघारी परतले. 193 धावांवर सात विकेट्स असताना विजयाची आशा मावळली होती. हातात ३ विकेट्स असताना ८३ धावांची गरज होती. अशात दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमारने केलेली भागीदारी ही निर्णायक ठरली. या दोन्ही खेळाडूंनी संयमी खेळी केली आणि श्रीलंकेच्या घशातून हा विजय खेचून आणला.

दरम्यान चहरसोहबत मैदानात असणाऱ्या भुवनेश्वर कुमारने या विजयाचं श्रेय कोच राहुल द्रविडला देत कसा राहुलचा एक निर्णय विजयासाठी महत्त्वाचा ठरला हे सांगितल. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना संघाचा उपकर्णधार भुवनेश्वर कुमारले सांगितलं, ‘आमचं लक्ष्य शेवटच्या षटकापर्यंत फलंदाजी करायचं हे होतं. आम्ही याच प्लानने फलंदाजी करत असताना दीपकने अप्रतिम फलंदाजी करत थेट विजयच मिळवून दिला.” यावेळी भुवनेश्वरने दिपकला 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचं कारणही सांगितलं.

तो म्हणाला “दीपक राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षतेखाती बरेच सामने खेळला आहे. भारताच्या ‘ए’ संघातही अनेक सिरीजमध्ये बरेच रन देखील केले आहेत. त्यामुळे द्रविडला दीपक धावा करु शकतो हे चांगल्याप्रकारे माहित होते. त्यामुळे त्याने दीपकला सातव्या स्थानावर फलंदाजीला पाठवले.”

सामन्यावेळी राहुल द्रविडने चहरसाठी एक संदेश पाठवला. “तुला शेवटपर्यंत खेळायचंय. सगळे बॉल खेळून काढ…” असा संदेश राहुलने चहरला दिल्यानंतर चहरने देखील हे लक्षात ठेवत संयमी खेळी केली.

महत्वाच्या बातम्या 

IMP