राहुल द्रविडवर बीसीसीआयने सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी

टीम महाराष्ट्र देशा- बीसीसीआयने द वाॅल राहुल द्रविडची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून निवड केली आहे.तरुण खेळाडूंना क्रिकेटचे योग्य धडे मिळावेत यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल द्रविडच्या अनुभवाचा युवा खेळाडू त्यांचे प्रशिक्षक या सर्वांना फायदा होणार आहे.

१९ वर्षाखालील संघातील खेळाडूंना तयार करण्याचं मोठं काम राहुल द्रविडच्या खांद्यांवर असणार आहे. याचसोबत राहुल द्रविडकडे बीसीसीआयशी संलग्न असणाऱ्या क्रिकेट अकादमींच्या प्रशिक्षकपदाची नेमणूकीचे अधिकारही देण्यात आले आहेत.