ड्रामा क्विन राखी सांवत पोहोचली इंडियन आयडलच्या सेटवर

मुंबई : छोट्या पडद्यावरील ड्रामा क्विन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सांवत नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असते. काही दिवसापुर्वी राखी सावंत ड्रामा क्विनच्या लुकमध्ये रस्त्य्यावर फिरताना आढळली होती. आता ती सोनी टिव्ही वरील प्रसिद्ध शो इंडियन आयडल मध्ये येऊन धडकणार आहे.

राखी सावंतने खुद्द याची माहिती सोशल मीडीयाच्या द्वारे दिली आहे. इंडियन आयडलच्या सेटवरील काही फोटो तिने इन्स्टाग्राम या सोशल मीडीयावर पोस्ट केली होती. बिग बॉसच्या घरात धमाल उडवणारी राखी सांवत इंडियन आयडलच्या सेटवर काय धमाल करणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. इंन्स्टाग्राम वर शेअर केलेल्या एका व्हिडीओत राखीने इंडियन आयडलच्या भागात खुप मोठा धमाका होणार आहे, असे म्हणाली.

राखीने शेअर केलेल्या फोटोत तीने भगव्या रंगाची साडी आणि गोल्डन रंगाचा ब्लाऊज परिधान केले आहे. त्याबरोबरच तिने खूप सारे दागिने घातले आहे. राखीने आणखी काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती गायिका सोनू कक्कड, अनु मलिक आणि कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आदित्य नारायण यांच्यासोबत दिसते आहे. बिग बॉस १४ मध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन केलेली राखी आता इंडियन आयडलच्या सेटवर काय धमाल करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP