सोलापूर महापौरांच्याच प्रभागात ड्रेनेजचे पाणी

सोलापूर: पद्मा टाॅकीजजवळ असलेल्या तीस घरांत मागील काही दिवसांपासून ड्रेनेजचे पाणी येत आहे.वारंवार सांगूनही प्रश्न सुटत नसल्याने संतप्त झालेले सत्ताधारी भाजपचे नगरसेवक अमर पुदाले, नागेश भोगडे, सोनाली मुटकिरी यांनी गुरुवारी मनपा झोन क्रमांक तीनमध्ये जाऊन जाब विचारला. नागरिकांच्या समस्या सुटत नसतील झोन कार्यालय कशाला उघडू द्यायचे, असा पवित्रा घेतला.

दरम्यान महापौर शोभा बनशेट्टी यांनी तातडीने बैठक घेऊन काम करण्याचे आदेश दिले.पद्मा टाॅकीज परिसराचा भाग महापौर बनशेट्टी यांच्या प्रभागात येतो. या भागातील सुमारे ३० घरांत ड्रेनेजचे पाणी येत असल्याने नागरिक वैतागले आहेत. याबाबत झोन कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली. मनपा सार्वजनिक आरोग्य अभियंता आणि झोन कार्यालय यांच्यात समन्वय नसल्याने काम झाले नाही. गुरुवारी सकाळी नगरसेवक पुदाले यांनी झोन कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. महापौर बनशेट्टी यांनी तेथे जाऊन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शुक्रवारपासून काम सुरू करण्याचे आदेश दिले

You might also like
Comments
Loading...