Pune Heavy Rain पुणे : पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून शहर संपूर्ण जलमय झाले आहे. अशातच पुण्यातील एरंडवणे येथील राजपूत वीट भट्टी परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून ड्रेनेजचे पाणी मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात शिरले आहे. पाणी शिरल्याने अनेक नागरिकांना तसेच दुकानदारांना मोठ्या संकटाला सामोरे जाव लागत आहे.
वारंवार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सांगून देखील फक्त आश्वासन मिळत असल्याने येथील स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात या ड्रेनेट लाईनच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना घराबाहेर देखील जाता येत नाही.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<