औरंगाबाद : वर्षभरापासून सिडको एन-६ मथुरानगर कुलस्वामिनी मंगल कार्यालयाच्या मागच्या बाजुस घाणीचे साम्राज्य पसरल्याने परिसरातील नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे सिडको एन-६ मथुरानगर भागातील रस्त्यावर तसेच घरासमोरून नाल्याचे घाण दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. कोरोना काळात नागरिकांच्या आरोग्याशी मनपा प्रशासन खेळत असल्याची टीका नागरिकांनी केली आहे.
मथुरानगर भागात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या परिसरात डास, मच्छर, विविध प्रकारचे किटके वाढल्याने साथीच्या रोगाची नागरीकांना तसेच लहान बालकांना महिलांना लागण झाली आहे. संपूर्ण गल्लीमध्ये ड्रेनेजचे घाण पाणी साचल्याने नागरीकांना ये जा करतांना मोठी कसरत करावी लागते. ड्रेनेजलाईनचे पाणी खुप मोठ्या प्रमाणावर वाहत असुन हेच पाणी पिण्याच्या पाण्याच्या नळाच्या आत जाऊन अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त पाणी नळाला येत आहे.
परिणामी फिल्टरचे विकतचे पाणी घ्यावे लागते. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सुद्धा बसत आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी या भागामध्ये नवीन ड्रेनेजलाईन टाकुन अतिरिक्त नविन चेंबर बांधावे व पाण्याचा निचरा चेंबरमध्ये करावा. तसेच सगळा परिसर स्वच्छ करून जंतुनाशक फवारणी या भागात करावी. व होणा-या त्रासापासून नागरिकांना मुक्त करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सत्तेसाठी भाजप नेत्यांची धडपड सुरू’, अशोक चव्हाणांची टीका
- निवडणूकांमध्ये काम केलेल्या शिक्षकांना शासनाची हुलकावणी, तीन वर्षांपासूनचे मानधन थकले!
- राजकीय घडामोडींना वेग; पवारांच्या निकटचे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
- ‘जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का?’, भाजप आ.अतुल भातखळरांचा सवाल
- औरंगाबादेत पुन्हा एकदा लसीकरण संकटात! सायंकाळपर्यंत लसींचा साठा येण्याची शक्यता
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<