Share

Mahaparinirvan Diwas | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापरिनिर्वाण दिवस का साजरा केला जातो?, जाणून घ्या

टीम महाराष्ट्र देशा: डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांना आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) या नावाने ओळखतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे जनक म्हणून संबोधले जाते. 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले होते. त्यामुळे दरवर्षी 6 डिसेंबर हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापरिनिर्वाण दिवस (Mahaparinirvan Diwas) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करणे आहे.

परिनिर्वाण म्हणजे मृत्यूनंतरचे निर्वाण. बौद्ध धर्माच्या अनेक मुख्यत्वांपैकी परिनिर्वाण एक महत्त्वाचे तत्त्व आहे. यानुसार, जो मनुष्य निर्वाण प्राप्त करतो तो संसारिक आसक्ती, मोहमाया, इच्छा आणि जीवनातील दुःखांपासून मुक्त राहतो. निर्वाण मिळवण्यासाठी मनुष्याला धार्मिक आणि सदाचारी जीवन जगावे लागते. हे जीवन जगणे अतिशय कठीण असते. भगवान गौतम बुद्धांच्या वयाच्या 80 व्या वर्षी झालेल्या मृत्यूला बौद्ध धर्मात महापरिनिर्वाण म्हणतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी अथक प्रयत्न केले होते. त्याचबरोबर त्यांनी गोरगरिबांची परिस्थिती सुधारणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. बौद्ध अनुयायांच्या मत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या कार्यातून निर्वाण मिळाले आहे. म्हणून त्यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरी केली जाते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वर्ष बौद्ध धर्माचा अभ्यास केल्यानंतर 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंतिम संस्कार बुद्ध धर्माच्या नियमानुसार करण्यात आला होता. मुंबईतील दादर चौपाटी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर अंत्यसंस्कार करण्यात आला होता. त्या भूमीला आता चैत्यभूमी म्हणून ओळखली जाते.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांना आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) या नावाने ओळखतो. डॉ. बाबासाहेब …

पुढे वाचा

Marathi News

Join WhatsApp

Join Now